हिवाळ्यात योगा फायदेशीर
हिवाळा सुरु झाला आहे, राज्यातील सर्वच भागांमध्ये हुडहुडी भरल्याचे पाहायला मिळतेय. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अशा वेळी आपले शरीर हे उबदार ठेवणे खूप गरजेचे असते. कारण थंडीच्या वातावरणात आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी योगा करणे हा उत्तम पर्याय मानला जातो.
Winter Yoga Tips हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. कारण योगासनांमुळे केवळ आपल्या शरीरावरच परिणाम होत नाही. तर योगाचा आपल्या मनावर देखील परिणाम होत असतो. शरीरासह मन देखील निरोगी ठेवायचे असेल तर योगासने ही अवश्य करावीत. आज आपण हिवाळ्यात कोणती योगासने करणे फायदेशीर ठरते. याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया शरीर उबदार ठेवण्यासाठी कोणती आसनं करावीत.
त्रिकोणासन
दोन्ही पायांमध्ये दोन फूट अंतर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत वर करुन घ्या. आता डाव्या बाजूने वाकत डाव्या हाताने डाव्याचा पायाचा अंगठा पकडा. उजवा हात वर सरळ रेषेथ ठेवा. थोडा वेळ याच पोजिशनमध्ये राहा.
वशिष्ठासन
योगा मॅटवर सरळ झोपा. यानंतर एका अंगावर सरळ झोपा. यानंतर शरीराचा संपूर्ण जोर एका हातावर येऊ द्या. तर एक हात सरळ रेषेत वर ठेवा.

शीर्षासन
हे आसन करण्यासाठी तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता. यासाठी सर्वात दोन्ही गुडघे आणि कोपर जमिनीवर टेकवा. यानंतर कोपरांच्या मधोमध आपले डोके ठेवा. यानंतर हळुहळू दोन्ही पाय एका सरळ रेषेत घेत भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा.
Mahindra Thar : महिंद्रा की नयी 7 सीटर कार नए ब्रेकिंग सिस्टम के साथ हुई लांच ,जानिए फीचर्स और कीमत
शवासन
Total lunar eclipse today 2022: पूर्ण चन्द्र ग्रहण आज
योगा मॅटवर सरळ झोपा. संपूर्ण शरीर शिथिल सोडा. यानंतर आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात करा. 10 ते 20 मिनिटे असेच राहा.